केसर जवळगा ता.उमरगा येथील संपादक नाना शेख यांना उत्कृष्ट व निडर पत्रकार म्हणून ” शाह जमात यल्गार पुरस्काराने सन्मानित

पुणे : केसर जवळगा ता.उमरगा जि. धाराशिव येथील रहिवाशी असून कामानिमित्त पुणे शहरात स्थायिक असलेले नाना शेख दैनिक जय हिंद महाराष्ट्र या दैनिकाचे संपादक म्हणून गेली अनेक वर्षे सातत्याने समाजाचे व सामाजिक विविध प्रश्न आरोग्य,शिक्षण,पाणी,रस्ते, अश्या अनेक विषयांना लेखणीच्या स्वरूपात वाचा फोडण्याचे काम अविरत चालू आहे.
याचीच दखल घेऊन पुण्यातील उत्कृष्ट व निडर पत्रकार शाह जमात भोसरी या नामांकित सामाजिक संस्थेचा पुरस्कार म्हणून नाना शेख यांना सन 2024 चा शाह जमात यांच्या वतीने सह मताने हा मानाचा “शाह जमात यल्गार पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.दर वर्षा प्रमाणें आज भोसरी येथे आयोजित जश्ने ईद मिल्लादुन्नबी निमित्ताने शाह जमात यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या जश्नामध्ये सर्व जाती जमातीचे नागरिक व सर्व समाज प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला.मला हा मानाचा पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल मी जमातचे अध्यक्ष शाह व मुख्य संयोजक युवा सामाजिक समाज सेवक मोहसिन भाई शाह यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो.सर्व भारतीयांना जश्ने ईद ए मिल्लादून्नब्बी निमित्ताने खुप खुप शुभेच्छा देतो.