पुणे: वाघोली जमीन घोटाळा : तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकसह चौघांवर फौजदारी गुन्हा दाखल

n6645562521747426547684fe555edc341bac820c52cb52eb394a6d4e2589eb293493606305ebf1618e6f4e.jpg

पुणे – वाघोली येथील तब्बल 10 एकर जमीन फसवणुकीच्या मार्गाने हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली असून, बनावट महिलेला मूळ मालकीण असल्याचे भासवून ही जमीन बळकावण्याचा डाव रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र सावरसिद्ध लांडगे आणि अपर्णा यशपाल वर्मा उर्फ अर्चना पटेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदननगर पोलिसांनी यासंबंधी सखोल तपास सुरू केला असून, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणामुळे पोलिस दलातील गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Spread the love

You may have missed