पुणे: अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांचा वॉच; येरवड्यात मोठी कारवाई 23 लाखांचे ड्रग्ज जप्त; अहमद खानवर पोलिसांची कारवाई

n6479742631737092557569b54ed405de19bef528ded78e45a71b10a370da3430ad5172e6ca012e51346f6c.jpg

पुणे: येरवडा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत २३ लाख ३८ हजार ४०० रुपयांचे मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे. ही कारवाई १५ जानेवारी रोजी करण्यात आली असून अहमद वाहिद खान (वय ४५, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुणे ड्रग्ज फ्री मोहिमेचा भाग
शहरात अंमली पदार्थ विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी ‘पुणे ड्रग्ज फ्री’ मोहिम अंतर्गत ही कारवाई केली. गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या सतर्कतेमुळे मोठा साठा जप्त करण्यात यश आले आहे.

पोलिसांची माहिती आणि कारवाईचे तपशील
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पोलीस अंमलदार बुधवारी येरवडा परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी अंमलदार आझाद पाटील यांना अहमद खानबाबत गुप्त माहिती मिळाली. खात्री केल्यानंतर खान याला ताब्यात घेतले गेले.

त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता ११० ग्रॅम मॅफेड्रॉन हा २२ लाख रुपयांचा अंमली पदार्थ सापडला. तसेच इतर ऐवजांसह एकूण २३ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

पोलीस अधिकारी आणि पथकाचे योगदान
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, साहिल शेख, रवींद्र रोकडे, चेतन गायकवाड, अझिम शेख, संदिप जाधव, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड, अमोल गायकवाड आणि विशाल निलख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सतर्कता वाढवणार
पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून शहरातील अंमली पदार्थ विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Spread the love

You may have missed