Pune Drugs Case: पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; विश्रांतवाडी परिसरातून 1कोटीचं ड्रग्ज जप्त, तिघांना अटक – व्हिडिओ

पुण्यातील एक ड्रग्ज प्रकरण समोर आले असून, त्यातून शहरात ड्रग्जच्या वाढत्या समस्या उघड झाल्या आहेत. पुण्यात कोटी रुपयांच्या किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, गेल्या काही दिवसांत शहरात मोठी ड्रग्ज रॅकेट्स समोर येत आहेत.
विश्रांतवाडी परिसरात पुणे पोलिसांनी एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला आहे, ज्याचे बाजार मूल्य एक कोटीपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. सुमारे अर्धा किलो एमडी ड्रग्ज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणात तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या तरुणांची नावे श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे, आणि निमिश सुभाष अभनावे अशी आहेत.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून या तरुणांना अटक करण्यात आली आहे, आणि त्यांच्याकडून 471 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. पुणे क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
पहा व्हिडिओ
या मोठ्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे, आणि या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी, 30 सप्टेंबर 2023 रोजी ससून रुग्णालयाच्या जवळ दोन कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन ड्रग्ज सापडले होते, ज्यामुळे पुण्यातील ड्रग्ज नेटवर्क समोर आले. तथापि, पोलिसांना अद्याप संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणे शक्य झालेले नाही. शहरात ड्रग्ज तस्करी आणि पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे, विशेषतः कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, आणि खराडीसारख्या भागांमध्ये, जिथे पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
विश्रांतवाडी मध्ये भीम नगर येथे मोठ्या प्रमाणात दोन नंबरचा धंदा चालतो
गुंड्या उर्फ सुरज माचरेकर याच्या अंडरमध्ये