Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील ‘त्या’ महिलांवर दाखल होणार गुन्हा! नेमकं कारण काय?

n64326089117341534095602a5221dc9ec407c2879a3a0325ca192f3bdabc843447ce78159a8c8561b2ec19.jpg

Ladki Bahin Yojana Latest News Update: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6 महिन्यात आतापर्यंत एकूण 17 हजार कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद महायुती सरकारने केली आहे.

या योजनेच्या 1500 रुपयांमध्ये वाढ करून महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये दिले जातील, असं आश्वास महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलं होतं.

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 2.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, यामध्ये 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रलंबित अर्जांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात 20 लाख 84 हजार अर्जदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्या महिलांना सरकारच्या अन्य योजनांचा लाभ मिळत असेल, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहने आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल, त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्या महिलांच्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे, त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीय. तसच ज्या कुटुंबातील महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीय.

Spread the love

You may have missed