वारजे एनडीए रोडवर तपोधामजवळ कचऱ्याचा ढीग; ‘कचरा टाकू नका’चा फलक केवळ शोभेसाठी?
Oplus_16908288
वारजे एनडीए रोडवरील तपोधाम परिसराच्या जवळ मेन रोडलगत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी ‘कचरा टाकू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल’ असा स्पष्ट इशारा देणारा फलक लावण्यात आला आहे. मात्र, फलकाच्या अगदी आसपासच कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यकच; मात्र कचरा साचल्यानंतर तो वेळेत उचलण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वारजे चौक तसेच कोथरूडच्या दिशेने जाणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यालगत कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाने केवळ ‘कायदेशीर कारवाई’चा फलक लावून न थांबता, प्रत्यक्षात हा कचरा तातडीने हटवून परिसर स्वच्छ व दुर्गंधीमुक्त करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
फलकावर कारवाईचा इशारा असूनही कचऱ्याचा ढीग का? स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची?
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४