पुण्यात वाहतूक कोंडीची कटकट वाढली; आयुक्त भल्यापहाटे रस्त्यावर उतरून घेतला आढावा

0
InShot_20251202_133107583.webp

पुणे – शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वारंवार येणाऱ्या तक्रारी, शहराचा वाढता विस्तार आणि अनियोजित वाहतूक रचना यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अखेर परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः भल्या पहाटे रस्त्यावर उतरून पाहणी केली. त्यांच्यासह सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, शहरातील वाहतूक पोलिसांवर दादागिरी करण्याच्या काही घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी वारजे परिसरात घडलेल्या प्रकारात एका चारचाकी वाहनचालकाने काळ्या काचा आणि ड्रायव्हिंग लायसन्स तपासणीदरम्यान पोलिसांशी उर्मटपणे वाद घातला होता. पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने संबंधित वाहनचालकाला हात जोडून माफी मागावी लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

विमाननगरमध्ये कोंडी चिंताजनक बनल्याने वाहतूक विभागाने तत्काळ उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. परिसरातील रस्त्यांवर नवी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली असून काही मार्गांवर एकेरी वाहतुकीचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकेरी वाहतूक लागू असलेले मार्ग (विमानतळ वाहतूक विभागांतर्गत):

श्रीकृष्ण हॉटेल चौक → दत्तमंदिर चौक → सीसीडी चौक → गंगापुरम चौक → कैलास सुपर मार्केट चौक → गणपती मंदिर चौक


दुतर्फा वाहतूक सुरू राहणारे मार्ग:

सीसीडी चौक → गंगापुरम चौक

दत्तमंदिर चौक → कैलास सुपर मार्केट चौक

गणपती मंदिर चौक → श्रीकृष्ण हॉटेल चौक


वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या या बदलांमुळे विमाननगर परिसरातील कोंडी काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीचे दीर्घकालीन नियोजन आणि कडक अंमलबजावणीची तातडीची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Spread the love

Leave a Reply