पुणे शहर : आयुक्त साहेब, वेळीच व्हा सावध. कमला नेहरू रूग्णालय जाऊ देऊ नका ससूनच्या मार्गावर.

0

जगी रुग्णालये आणि महापालिका अधिकारी या दोहोंना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्याचे आव्हान आयुक्तांच्यापुढे…

अतिरिक्त आयुक्त पदावरील विकास ढाकणे यांच्यानंतर आता नंबर कोणत्या अधिकाऱ्याचा?केंद्रीय मंत्री मोहोळ आणि गणेश बिडकर यांनी सुधारणा केलेल्या रुग्णालयाकडे लक्ष देण्याची गरज

पुणे- पुण्यातील गुन्हेगारीने आता कळस गाठला आहे. काही स्वरूपात राजकीय आश्रय मिळू लागल्याने किंवा बलशाली ठेकेदारांनी वाचक बसविणारे गुन्हेगार पाळून ठेवल्याने पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांना आता टार्गेट करत तुंबडी भरण्याचे उद्योग प्रशासकीय काळात जोरात सुरु झाल्याचे चित्र असून नुकत्याच कळसावर गाजलेल्या ससून प्रमाणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाची अवस्था होऊ नये असे वाटत असेल तर महापालिका आयुक्तांनी आताच प्रामाणिक अधिकाऱ्यांना संरक्षण देऊन खाजगी रुग्णालये आणि महापालिका अधिकारी या दोहोंना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करणे जरुरीचे ठरणार आहे.

आरोग्य खात्यातील अधिकारी आणि खाजगी रुग्णालये टार्गेट करून स्वतः ची तुंबडी भरण्याचे उद्योग काहींनी सुरु केले असून याचा प्रत्यय कमला नेहरू रुग्णालयातून येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या संर्दभात महापालिकेने काही वेळा पोलिसांकडे संपर्क साधला पण तो केवळ बोगस कागदपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ उठविण्याच्या संदर्भा पुरताच मर्यादित होता.पण मान्यवर खाजगी रुग्णालयातील उच्चस्थानी बसलेले महारथी मात्र या टोळ्या असल्याचे, आपले नाव पुढे येऊ न देता खाजगीत सांगत आहेत. सामान्य माणसाला, किंवा कोणालाही आपले हित करवून घ्यायचे असते आणि मग त्यासाठी त्याची खोटी कागदपत्रे करवून आरोग्य विषयकच्या योजनांकडे त्याला वळवून त्याचाकडून त्यासाठी काही मलिदा काढायचा आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बिले मंजूर होताच त्याची माहिती स्वतः रुग्णालयांना कळवून तुमचे बिल काढून दिलेय सांगून रुग्णालयांकडून टक्केवारी उकळायची असा हा गोरख धंदा करणारी मुख्य टोळी शहराच्या या भागातून कार्यरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वेळप्रसंगी शासकीय अधिकाऱ्यांनाही बदल्यांच्या धमक्या दिल्या जातात असेही दिसून आले आहे.

महापालिकेच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांना गुंडगिरीचे गंगाजल प्यावे लागल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक,  रवींद्र बिनवडे आणि काही जुन्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा गुंडगिरीचा व्यवस्थित सामना करत त्यांना धुडकावून लावण्यात यश मिळविले होते. पण सध्या प्रशासकीय काळात असंख्य जुने जाणते निवृत्त झाले आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा सुकाळ आल्याचे मानले जाऊ लागले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकाचा कमला नेहरू रुग्णालयात व महापालिकेतील कार्यालयांत वारंवार हस्तक्षेप होतो आहे आणि रुग्णांच्या नावाने सोयी सवलती मागण्याच्या बहाण्याने काम करणाऱ्या 1/2 महाभागांच्या हस्तक्षेपाने देखील आरोग्य खात्यातील काहीजण आता या टोळीची मर्जी सांभाळू लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आरोग्य खात्यातील विविध योजना नागरी स्तरावर पोहोचण्याचे काम करतो असे दाखवत रुग्णांकडून पैसे उकळून रुग्णालयांकडूनही बिलांच्या नावे टक्केवारी उकळून नव्या खंडणीवसुलीचे पर्व या प्रशासकीय काळात सुरु झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त सन्मान या टोळ्यांचे प्रमुख मिळविताना दिसत आहेत.आणि हीच महापालिकेच्या आरोग्य खात्यासाठी धोक्याची घंटा आहे. महापालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली दबावातून केली गेल्याचे वारंवार सांगण्यात येते. त्यांच्या नंतर आता बळी गेलाच तर आरोग्य खात्यातील कोणाचा जाणार काय ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थिती होतो आहे. महापालिकेत आणि महापालिकेच्या वर्तुळातील हे गंगाजल समजून घेऊनही आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही किंवा आपल्या बरोबरच्या अधिकाऱ्यांना संरक्षण दिले नाही तर कमला नेहरू रुग्णालयाचे ससून व्हायला अवधी लागणार नाही. ससून चे पितळ उघडे पडले तरीही आपण सावध न होता त्याकडे डोळेझाक करणे निश्चितच शहराच्या हिताचे नाही असे सूत्रांनी म्हटले आहे. यामुळेकेंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी चांगल्या सुधारणा केलेल्या रुग्णालयाकडे आयुक्तांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

आरोग्य खात्यातील अधिकारी आणि खाजगी रुग्णालये टार्गेट करून स्वतः ची तुंबडी भरण्याचे उद्योग काहींनी सुरु केले असून याचा प्रत्यय कमला नेहरू रुग्णालयातून येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या संर्दभात महापालिकेने काही वेळा पोलिसांकडे संपर्क साधला पण तो केवळ बोगस कागदपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ उठविण्याच्या संदर्भा पुरताच मर्यादित होता.पण मान्यवर खाजगी रुग्णालयातील उच्चस्थानी बसलेले महारथी मात्र या टोळ्या असल्याचे, आपले नाव पुढे येऊ न देता खाजगीत सांगत आहेत. सामान्य माणसाला, किंवा कोणालाही आपले हित करवून घ्यायचे असते आणि मग त्यासाठी त्याची खोटी कागदपत्रे करवून आरोग्य विषयकच्या योजनांकडे त्याला वळवून त्याचाकडून त्यासाठी काही मलिदा काढायचा आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बिले मंजूर होताच त्याची माहिती स्वतः रुग्णालयांना कळवून तुमचे बिल काढून दिलेय सांगून रुग्णालयांकडून टक्केवारी उकळायची असा हा गोरख धंदा करणारी मुख्य टोळी शहराच्या या भागातून कार्यरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वेळप्रसंगी शासकीय अधिकाऱ्यांनाही बदल्यांच्या धमक्या दिल्या जातात असेही दिसून आले आहे.

महापालिकेच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांना गुंडगिरीचे गंगाजल प्यावे लागल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, रवींद्र बिनवडे आणि काही जुन्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा गुंडगिरीचा व्यवस्थित सामना करत त्यांना धुडकावून लावण्यात यश मिळविले होते. पण सध्या प्रशासकीय काळात असंख्य जुने जाणते निवृत्त झाले आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा सुकाळ आल्याचे मानले जाऊ लागले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकाचा कमला नेहरू रुग्णालयात व महापालिकेतील कार्यालयांत वारंवार हस्तक्षेप होतो आहे आणि रुग्णांच्या नावाने सोयी सवलती मागण्याच्या बहाण्याने काम करणाऱ्या 1/2 महाभागांच्या हस्तक्षेपाने देखील आरोग्य खात्यातील काहीजण आता या टोळीची मर्जी सांभाळू लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आरोग्य खात्यातील विविध योजना नागरी स्तरावर पोहोचण्याचे काम करतो असे दाखवत रुग्णांकडून पैसे उकळून रुग्णालयांकडूनही बिलांच्या नावे टक्केवारी उकळून नव्या खंडणीवसुलीचे पर्व या प्रशासकीय काळात सुरु झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त सन्मान या टोळ्यांचे प्रमुख मिळविताना दिसत आहेत.आणि हीच महापालिकेच्या आरोग्य खात्यासाठी धोक्याची घंटा आहे. महापालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली दबावातून केली गेल्याचे वारंवार सांगण्यात येते .त्यांच्या नंतर आता बळी गेलाच तर आरोग्य खात्यातील कोणाचा जाणार काय ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थिती होतो आहे. महापालिकेत आणि महापालिकेच्या वर्तुळातील हे गंगाजल समजून घेऊनही आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही किंवा आपल्या बरोबरच्या अधिकाऱ्यांना संरक्षण दिले नाही तर कमला नेहरू रुग्णालयाचे ससून व्हायला अवधी लागणार नाही. ससून चे पितळ उघडे पडले तरीही आपण सावध न होता त्याकडे डोळेझाक करणे निश्चितच शहराच्या हिताचे नाही असे सूत्रांनी म्हटले आहे.यामुळेकेंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी चांगल्या सुधारणा केलेल्या रुग्णालयाकडे आयुक्तांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Link source: My marathi

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed