पुणे: कोरेगाव भीमा विजयस्तंभास मानवंदना: अखिल भारतीय समता सैनिक दलाचे स्वागत व सेवा कार्यक्रम यशस्वी

IMG-20250104-WA0002.jpg

पुणे: कोरेगाव भीमा विजयस्तंभास मानवंदनेसाठी आलेल्या अखिल भारतीय समता सैनिक दल, नागपूर व मुंबई शाखांचे पुण्यात येरवडा भागात मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. या सैनिक दलाच्या सदस्यांसाठी मदर तेरेसा हॉल व सम्राट अशोक बुद्ध विहार येथे तीन दिवसांच्या राहण्याची, चहा-नाश्ता व भोजनाची सोय करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. दीपक त्रिभुवन यांनी केले होते. यावेळी माजी नगरसेवक अविनाश दादा साळवे, माजी नगरसेवक जॉन पॉल, समाजसेवक डॅनियल लांडगे, आणि हसन भाई खान यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.

कार्यक्रमादरम्यान एम्पायर चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. ज्योती दवे, डॉ. विनय दवे, व डॉ. सुरेश कठाणे यांनी आरोग्य सेवा दिली. तसेच गौतम ओहोळ, सुरेश रोकडे, शोभाताई बिचकुले, ज्योतीताई कडाळे, शेलार ताई, भिमराव वाघमारे, एन.जी. शिंदे, राजेंद्र घोडेस्वार, अलका गायकवाड, शिला घोडेस्वार, शारदा ओव्हाळ, व भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त के.बी. मोटघरे यांचीही उपस्थिती होती.

31 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 या कालावधीत झालेल्या या कार्यक्रमात 300 भीम सैनिकांना समता सैनिक दल पुणे आणि सम्राट अशोक बुद्ध विहार समितीने सर्वतोपरी मदत केली. समितीचे अध्यक्ष सागर वानखेडे, उपाध्यक्ष अविनाश कांबळे, आणि कोषाध्यक्ष राजेश कांबळे यांनी आयोजन यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी दलाचे सैनिक अशोक अवचरे यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Spread the love

You may have missed