पुणे शहर : अधिकाऱ्यांना तीर्थ म्हणून पाजले इंद्रायणीचे प्रदूषित पाणी; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे अजब आंदोलन, VIDEO

IMG_20240628_095848.jpg

पुणे : इंद्रायणी नदीच्या जलप्रदूषणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज शिवाजीनगर येथील कार्यालयात वारकरी बांधवांसोबत आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना इंद्रायणी नदीचे प्रदूषित पाणी तीर्थ म्हणून पाजत हे आंदोलन करण्यात आले. तसेच इंद्रायणी नदीच्या जलप्रदूषणाबद्दल प्रशासनाने पावले उचलली नाही तर प्रदूषित पाण्याने अधिकाऱ्यांना आंघोळ घालायला मागेपुढे बघणार नाही असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी यावेळी दिला.

Link source: civics mirror

Spread the love

You may have missed