सय्यदनगरमध्ये सांडपाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय; प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा
Oplus_16908288
प्रभाग क्रमांक ४१, गल्ली क्रमांक १६, सय्यदनगर येथे रस्त्यावर सांडपाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात वारंवार पाणी साचत असल्याने नागरिक आणि दुकानदारांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.
साचलेल्या पाण्यामुळे मंदिर-मशिदीत जाणाऱ्या नागरिकांसह स्थानिक रहिवाशांना रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येची तातडीने पाहणी करून सांडपाण्याचा योग्य निचरा आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
ही समस्या वारंवार निर्माण होत असल्यास संबंधित कामाची गुणवत्ता आणि कंत्राटदाराच्या कामाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासन या समस्येची तातडीने दखल घेऊन नागरिकांना दिलासा देणार का?
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४