वारजे–वडगाव नवीन ब्रिजवर स्वच्छतेचा प्रश्न; संबंधित विभाग लक्ष देणार का?

0
HPIQ0wbaAAAKs50

वारजे–वडगाव नवीन ब्रिज सुरू होऊन अवघे दोन महिने झाले असताना परिसरात कचरा, चिखल आणि सांडपाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नवीन ब्रिजच्या नियमित स्वच्छतेकडे आणि देखभालीकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्त्याच्या परिसरात साचलेला कचरा वेळेवर उचलला जात आहे का? सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत का? नवीन रस्ता स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी संबंधित विभागाकडून नियमित पाहणी केली जाते का?
अवघ्या दोन महिन्यांतच अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने संबंधित यंत्रणा याकडे लक्ष देऊन लवकरच स्वच्छता आणि आवश्यक उपाययोजना करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com⁠�
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply