संतोष सुदाम आरडे यांची वडगांवशेरी विधानसभा मतदार संघासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती
पुणे – काँग्रेस कमिटीच्या वतीने २०८ वडगांवशेरी विधानसभा मतदार संघासाठी माजी नगरसेवक संतोष सुदाम आरडे यांची समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी व इतर घटक पक्ष तसेच स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून प्रचार यंत्रणेला गती देणे, हा या नियुक्तीमागचा उद्देश आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. बापूसाहेब तुकाराम पठारे यांना मतदार संघात मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आरडे यांच्याकडून विशेष प्रयत्न अपेक्षित आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देत, प्रचार मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत.
या निवडीमुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण असून, या समन्वयकाच्या नेतृत्वात वडगांवशेरी मतदार संघात प्रभावी प्रचार मोहिम राबवली जाईल, अशी काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे.