पुणे शहर: काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद; वाचा सविस्तर

water-cut.jpg

पुणे : पर्वती एमएलआर टाकीच्या अखत्यारीतील हरकानगर भवानी पेठ येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी गुरुवारी (२६ डिसेंबर) पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या दरम्यान, ४५० मि.मी बटरफ्लाय व्हॉल्व बसवणे आणि ३०० मि.मी व्यासाच्या नलिकेस ५०० मि.मी नलिकेशी जोडणीचे महत्त्वाचे काम होणार आहे.

कामामुळे शुक्रवार (२७ डिसेंबर) रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे भाग:

पर्वती एमएलआर टाकी परिसर

शंकर शेठ रोड परिसर

गुरुवार पेठ, बुधवार पेठ

काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर

गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ

लोहिया नगर, सोमवार पेठ

अरुण वैद्य स्टेडियम परिसर

घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकीज मागील परिसर

पर्वती दर्शन आणि मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग

सारसबाग परिसर, खडकमाळ आळी

शिवाजी रोड परिसर, मुकुंद नगर

महर्षि नगर, टीएमव्ही कॉलनी

मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत

अप्सरा टॉकीज परिसर, मीरा आनंद परिसर

श्रेयस सोसायटी


नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Spread the love

You may have missed