पुणे: माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची ACB चौकशी सुरू!; अमनोरा टॉवरचा आलिशान व्हिला, मुंबईत पंचतारांकित फ्लॅट – ACBच्या चौकशीत मोठा खुलासा

n64958562217381303121396c925a5054337c26f6cee39cebc3e1cd6f796c335104a4f12a7adb120bec616f.jpg

माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची ACB चौकशी सुरू

पुणे: पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. भाजप नेते सुधीर आल्हाट यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.

सुधीर आल्हाट यांनी अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ACB ने त्यांच्या संपत्तीची प्राथमिक चौकशी केली. यात काही महत्त्वाचे तथ्य आढळल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे पुढील चौकशीसाठी परवानगी मागितली गेली आहे.

मुंबई-पुण्यात महागड्या मालमत्तेचा खुलासा

चौकशीत गुप्ता यांच्या नावावर मुंबईतील सांताक्रूझ येथे पंचतारांकित फ्लॅट आणि पुण्यातील अॅमनोरा टॉवरमध्ये आलिशान व्हिला असल्याचे उघड झाले आहे. या संपत्तीबाबतच्या माहितीसाठी सुधीर आल्हाट यांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) अर्ज केला होता. त्यातूनच ही माहिती बाहेर आली आहे.

शिवाजी सहकारी बँक घोटाळ्याशी संबंध?

यापूर्वी, शिवाजी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार सुधीर आल्हाट यांना अटक करण्यात आली होती. काही महिने तुरुंगवासानंतर बाहेर आल्यावर आल्हाट यांनी गुप्ता यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी पुढाकार घेतला.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून

सध्या ACB ने या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. चौकशीत नव्याने कोणते खुलासे होतात आणि पुढील कारवाई काय होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Spread the love