पुण्यात कोयता गँगचा हैदोस, सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला!

0

पुणे: शहरातील गुन्हेगारीचे स्वरूप आणखी गडद होत चालले आहे. कोयता गँगने पुन्हा एकदा पुणेकरांना दहशतीत टाकले असून, आता थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड गेले होते. गुंडांविरोधात कारवाई करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या मोहिमेतच, कोयता गँगच्या गुंडांनी थेट पोलीस अधिकाऱ्यावरच हल्ला चढवला. कोयत्याच्या या प्राणघातक हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन गुंडांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक गुंड निहाल सिंग असल्याचे समजते.

पुण्यात कोयता गँगच्या वाढत्या दहशतीच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असले, तरी सहाय्यक पोलीस निरीक्षकावर झालेल्या हल्ल्याने या गँगची वाढती ताकद आणि दहशत याची पुन्हा एकदा प्रचिती येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *