“माहिती अधिकार कायदा २००५ ‘सलोखा मार्गदर्शक’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन”

IMG-20241018-WA0059.jpg

दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यात मानस प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या “सलोखा मार्गदर्शक” पुस्तकाचे प्रकाशन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री राधाकृष्ण पवार, सहसंचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते झाले.

या वेळी अध्यक्ष म्हणून यशदाचे वरिष्ठ ग्रंथपाल श्री शशिकांत चौधरी उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष जी बसवेसकर उपस्थित होते. तसेच, मार्गदर्शक पुस्तकाच्या लेखिका आणि प्रमुख प्रशिक्षक श्रीमती रेखा सांळुके यांनी आपल्या अनुभवाचे मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचे आयोजन मानस प्रशिक्षण संस्था, पुणे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाच्या वतीने करण्यात आले.

या प्रसंगी दादु बुळे, संशोधन अधिकारी तथा प्रशिक्षक, यशदा पुणे आणि महासंघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या कार्यक्रमातून माहिती अधिकार कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

शुभेच्छक म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री इस्माईल शेख यांनी कार्यक्रमाला विशेष पाठिंबा दर्शविला.

Spread the love

You may have missed