Food Poisoning in Pune School: अन्नातून विषबाधा झाल्याने 28 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली; पिंपरी चिंचवडच्या डीवाय पाटील शाळेतील घटना – व्हिडिओ

0

Food Poisoning in Pune School: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील डीवाय पाटील शाळेतील 28 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पहा व्हिडिओ

या 28 पैकी काही विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. प्रभावित विद्यार्थी प्रामुख्याने इयत्ता 1 ते 4 थीच्या वर्गातील आहेत. माहितीनुसार, शाळेने 350 विद्यार्थ्यांसाठी नाश्त्यासाठी सँडविच तयार केले होते. सँडविच खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या आणि ते आजारी पडले.

अनेकांनी मळमळ, चक्कर येणे आणि पोटदुखी यांसारख्या लक्षणांची नोंद केली.त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांचे डीसीपी शिवाजी पवार यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनत्यांनी दिले.

अन्नातून विषबाधा झाल्याने 28 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली-

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *