World Yoga Day 2024: रामदास आठवले यांचा योगासने करतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यानी उडवली खिल्ली (Watch Video)

n618808164171903064568956c2abe6a531b0de2837556c5aba2064b091fd3911a90a4a9d830696d863d929.jpg

World Yoga Day 2024: आज 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जात आहे. या निमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मंत्री-अधिकारी सहभागी झाले. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते योगासने करताना दिसत आहेत.

आठवले हे नेहमी त्यांच्या कवितेमुळे चर्चेत असतात, आता आज ते योगासनामुळे चर्चेत आले आहेत. एका X यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आठवले ज्याप्रकारे योगासने करत आहेत ते पाहून सोशल मिडियावर याची खिल्ली उडवली जात आहे. या योगा व्हिडिओवर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.

एका युजरने म्हटले, ‘Yoga Hum Sharminda Hain’, तर दुसऱ्याने म्हंटले ‘When Maalik Forces To Do Yoga on This Day to Employees’. अजून एकाने तर चक्क कविता लिहली ‘आज हम करेंगे योगा, आज हम करेंगे योगा, क्यूंकि क्या पता कल क्या होगा’.

Spread the love

You may have missed