पुणे: शिक्षणाच्या माहेरघरात चाललंय काय ? नामांकित शाळेतील शिक्षकाकडून 10 व 11 वर्षांच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

n643989743173458273945573bade73f4231f245a7267860206140b9e84f1c8ffa068a79544cc630ec457f3.jpg

पुणे : शहरातील कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील डान्स शिक्षकाने 11 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

आरोपी डान्स शिक्षकाने 11 वर्षाच्या मुलासह इतर विद्यार्थ्यांवर देखील लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने आणखी किती मुलांसोबत हा प्रकार केला त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

याप्रकरणी पोलीसांनी शिक्षकाला तात्काळ अटक केली आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरु असताना हा सर्व प्रकार समोर आला आहे. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. आरोपी शैक्षणिक संस्थेत डान्स शिक्षक म्हणून नोकरी करत आहे. तो पहिली ते पाचवी इयत्तेमध्ये शिकणा-या मुला-मुलींना नृत्याचे शिक्षण तो देत होता.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी शिक्षक मंगेशविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला बेड्या ठोकल्या. आरोपींने इतर बालकांशी असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने शिक्षकास 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Spread the love

You may have missed