पुणे: “ससून रुग्णालयातील वार्डांची संख्या डीनला माहित नाही, दादा गायकवाडांचा गंभीर आरोप”

n62335981417217506249507bdc544664ee49fb4ae949a5b297113fd02bde6a93fb232fdd25eccc5902a16d.jpg

पुणे: दादा गायकवाड यांनी मागील आठ दिवसांपासून ससून हॉस्पिटलच्या बाहेर बेवारस रुग्णांची स्थिती सुधारण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाच्या आठव्या दिवशी, ससूनचे डीन एकनाथ पवार आणि अधीक्षक यलप्पा जाधव यांनी गेटवर येऊन गायकवाड यांच्याशी चर्चा केली.

डीन पवार यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली, त्यावर गायकवाड यांनी त्यांना ससून रुग्णालयातील वॉर्डांची संख्या विचारली. मात्र, डीन पवार यांना उत्तर देता आले नाही. यामुळे गायकवाड यांनी विचारले की, जर तुम्ही ससूनचे डीन आहात आणि वॉर्डांची माहितीच नाही, तर तुम्ही इतरांवर कारवाई कशी करणार?

गायकवाड यांनी आणखी एक मुद्दा मांडला की, तुम्हाला रुग्णांची स्थिती, गायब किंवा अॅडमिट रुग्णांची माहिती नसल्याने मला न्याय कसा मिळणार? गायकवाड यांनी एकनाथ पवार आणि यलप्पा जाधव यांच्यावर कारवाईची मागणी केली आणि ससूनमध्ये एक मोठा रॅकेट चालू असल्याचा गंभीर आरोप केला.

Spread the love

You may have missed