पुणे शहरात पोलीस आयुक्तांचे आदेश धाब्यावर; येरवड्यात छुपे अवैध धंदे सुरूच

dav_V_jpg-1280x720-4g.webp

पुणे: शहरात पोलीस आयुक्तांच्या कडक आदेशानंतर देखील काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे धंदे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने चालत असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये हे प्रकार अधिक तीव्र झाले आहेत.

येरवडा शेलार चाळ, मदर टेरेसा नगर, भाट नगर, पांडू लमाण वस्ती, ऑनलाइन गेमिंग पार्लर, या भागामध्ये अवैध मटका, जुगार, मद्यविक्री, वेश्याव्यवसाय यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांचे प्रमाण वाढत असून, यामध्ये स्थानिक पोलिसांचा सहभाग असल्याच्या आरोपांनी पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकारांवर कारवाईसाठी कडक आदेश दिले असतानाही काही ठिकाणी या कारवाया निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहे.

गुन्हे शाखेच्या विशेष पथकांना याबाबत अनेक तक्रारी मिळाल्या असून, लवकरच अशा ठिकाणी धाडसत्र राबवले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांत चिंता निर्माण झाली असून, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Spread the love

You may have missed