अखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

2

लाडकी बहिण योजना: महाराष्ट्रात मुख्य चर्चेचा विषय
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. विरोधकांनी या योजनेवरून सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात लाडका भाऊ योजना सुरू करण्याची मागणी केली होती. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी लाडका भाऊ योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारविरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी सुरू केली होती. विधानसभेत अध्यक्षांना निवेदन दिल्यानंतर, जीआर काढण्यात आल्याने वडेट्टीवार यांनी हक्कभंग आणण्याचा इशारा दिला. आदित्य ठाकरे यांनी फक्त होर्डिंगसाठी ही योजना जाहीर केल्याची टीका केली होती.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: तपशील
जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी या योजनेसाठी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत.

तरुणांसाठी लाडका भाऊ योजना
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध योजनांची घोषणा करताना, युवा अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत 10 लाख सुशिक्षित तरुणांना 10 हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणून विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणांचा पाऊस
– राज्यात वीरशैव कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ आणि महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार.
– चंद्रपूर येथील श्री माता महाकाली मंदिर यात्रा परिसर विकास आराखड्यासाठी 250 कोटी रुपये दिले जाणार.
– मुंबई महापालिका सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास, सफाई कामगारांच्या विस्थापन भत्त्यात वाढ.
– 15 वर्षांच्या आतील परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क स्थगिती देण्याचा निर्णय.
– पालघर येथे विमानतळ स्थापन होणार.

Spread the love

2 thoughts on “अखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed