पुण्यात आता शाळांजवळ कॅफिनचे प्रमाण जास्त असलेले एनर्जी ड्रिंक विकले जाणार नाहीत

n62178530717209357730438d39de9201566d90766fc0a826d080edbbc0e1270c48dbc3407a06a78380a1f6.jpg

पुणे : सध्या लहान मुले आणि तरुण हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि फास्ट फूडमध्ये खाण्याच्या शौकीन आहेत. त्यासोबतच त्यांना एनर्जी ड्रिंक्स पिण्याचाही शौक आहे. टीव्हीवर आपण अनेक एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिराती पाहिल्या असतील. शाहरुख, सलमान, हृतिक रोशन यांसारख्या मोठ्या कलाकारांनी या जाहिरातींमध्ये भाग घेतला आहे आणि ते एनर्जी ड्रिंक्स पिण्याचा सल्ला देतात.

महाराष्ट्रातील शाळांच्या जवळ असलेल्या एनर्जी ड्रिंक्स विकणाऱ्या दुकानांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. महाराष्ट्र सरकार आता या ड्रिंक्सवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. विधानपरिषदेत बोलताना अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले की, विभाग शाळांच्या आसपास एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर आदेश जारी करेल.

बंदी आदेश जारी होणार
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विधान परिषदेत सांगितले की, त्यांच्या विभागाने शाळांच्या 500 मीटर परिसरात उच्च कॅफिन एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करणार आहे.

यादी तयार करण्याच्या सूचना
राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले. आत्राम म्हणाले, “FDA लवकरच राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात उच्च-कॅफिन असलेल्या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी करेल. “सध्याच्या नियमांनुसार, एक लिटर कार्बोनेटेड किंवा नॉन-कार्बोनेटेड पेयामध्ये 145 मिली ते 300 मिली कॅफिनला परवानगी आहे.” परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोरे यांनी आत्राम यांना आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बंदी घालण्यात येणाऱ्या शीतपेयांची यादी तयार करून राज्यभरातील FDA अधिकाऱ्यांना पाठविण्याचे निर्देश दिले.

Spread the love

You may have missed