दुधनी येथे संविधान दिन उत्सव साजरा दुधनी

दुधनी : तालुक्यातील दुधनी येथे जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रगतीशील शेतकरी शंकर भांजी, बाबा टक्कळकी, सैदप्पा झळकी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा विधी पार पडला.
कार्यक्रमात संविधानाच्या महत्वावर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सैदप्पा झळकी, निंगप्पा निंबाळ, शिवापुत्र गायकवाड यांसारख्या वक्त्यांनी भारतीय संविधानाचे मोल अधोरेखित करत प्रजासत्ताकाच्या सुदृढतेसाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचे आवाहन केले.



यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला. उपस्थित मान्यवरांमध्ये शंकर भांजी, बाबा टक्कळकी, गोराकनाथ दोधामनी, निंगप्पा निंबाळ, संतोष जन्ना, गुरु दोड्डमनी, सुरेश झळकी, बसू जन्ना, सतलिंग निंबाळ, शिवपुत्र गायकवाड, काजप्पा शिंगे, महेंद्र लोडेंन, सैदप्पा झालकी, गुरु गायकवाड, लक्ष्मीपुत्र रेऊर, अर्जुन झालकी, पिंटू लोड्डन, मुक्यादापाक माल्लाप्पा कांबळे सर आणि महेश गायकवाड सर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या शिक्षकांनी केले, तर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा उत्सव नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी प्रेरणादायी ठरला.