बालआधार,आधारला मोबाईल लिंक, लाडकी बहिण योजनेचा मेळावा‌ संपन्न.

IMG-20240714-WA0013.jpg

बालआधार,आधारला मोबाईल लिंक, लाडकी बहिण योजनेचा मेळावा‌ संपन्न. वाघोली: वाघोली येथील गायत्री पार्कमध्ये मोफत बालाधार,आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे आणि लाडकी बहिण योजनेचा मेळावा‌ पार पडला.या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना आधार कार्डच्या सुविधा सुलभरीत्या मिळाव्यात यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. वाघोली पोस्ट ऑफिसचे पोस्टमन नामदेव गवळी यांच्या माध्यमातून परिसरातील अनेक ठिकाणी मोफत आधार कार्ड मेळावे राबवले जातात. भारतीय डाक विभागाच्या लाभदायी योजना सर्वसामान्य जनतेला माहित व्हाव्यात आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ लोकांना व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. वांढेकर यांच्या पुढाकाराने घेतलेल्या या मेळाव्यामध्ये दोनशेच्यावर लोकांनी सहभाग नोंदवला.प्रामुख्याने महिलांची संस्था लक्षणीय होती. सुमारे सव्वाशे लोकांनी या मेळाव्याचा लाभ घेतला.यावेळी पोस्टमन नामदेव गवळी,पांडुरंग आनंदे,रितेश वाघ,सुरेश वांढेकर,मधुकर जोशी,गणेश कड,बाळासाहेब कुंभारकर आणि नागरिक उपस्थित होते.

Spread the love

You may have missed