मोठी बातमी ! पाण्याचा प्रवाह वाढला, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी भुशी धरण बंद, पर्यटकांचा हिरमोड । Lonavala Bhushi Dam Updates
Lonavala Bhushi Dam Rain Updates : लोणावळा शहरात सध्या प्रचंड पाऊस पडत आहे. मागील 24 तासांपासून या परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून, ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. भुशी धरण आधीच ओव्हरफ्लो झाले होते आणि आता पाण्याचा प्रवाह आणखी वाढल्याने धरणाच्या पायऱ्यांवर पाणी जोरदार वाहत आहे.
ही स्थिती पर्यटकांसाठी सुरक्षित नाही, त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने भुशी धरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस ओसरून पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत भुशी धरण पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. लोणावळा शहर आणि डोंगराळ भागात पावसाचा जोर वाढल्याने पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आणि धबधब्याखाली न उभे राहण्याचे सुचना दिल्या आहेत. शनिवारी (दि. 13) लोणावळ्यात यंदाच्या हंगामातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत लोणावळा शहरात 216 मी.मी. पाऊस झाला आहे.