महापालिकेचा दावा विरुद्ध वास्तव! नाना वाडा चौकाजवळ पावसाळी चेंबर तुंबले; धोकादायक लोखंडी फ्रेममुळे अपघाताची भीती

0

पुणे दि ११जुलै : पावसाळ्यापूर्वी शहरातील पावसाळी चेंबरची १०० टक्के स्वच्छता पूर्ण झाल्याचा दावा पुणे…

Spread the love
1003717909

पुणे दि ११जुलै : पावसाळ्यापूर्वी शहरातील पावसाळी चेंबरची १०० टक्के स्वच्छता पूर्ण झाल्याचा दावा पुणे महानगरपालिका दरवर्षी करत असते. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी रस्त्यावर, नाना वाडा चौकाजवळ दिसणारे वास्तव या दाव्यालाच छेद देणारे आहे.
या ठिकाणी पावसाळी चेंबर मध्ये  गाळ, कचरा पूर्णपणे भरले असल्याचे  निदर्शनास आले आहे. एवढेच नव्हे, तर चेंबरवरील लोखंडी फ्रेम, पट्ट्या आणि अँगलचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी फटी निर्माण झाल्याने दुचाकींची चाके अडकण्याचा धोका वाढला असून पादचाऱ्यांचाही पाय अडकून अपघात होण्याची शक्यता आहे.
दररोज हजारो नागरिक, वाहनचालक आणि भाविकांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर अशी परिस्थिती असताना संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच पावसाळी चेंबरची अशी अवस्था असेल, तर इतर भागांतील परिस्थिती किती गंभीर असेल, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. महापालिकेच्या कागदोपत्री दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष कामांना अधिक महत्त्व देण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
संभाव्य अपघात आणि पावसाळ्यातील पाणी तुंबण्याच्या समस्या टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने या चेंबरची स्वच्छता करून धोकादायक झालेली लोखंडी फ्रेम बदलावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed