येरवडा: यल्लमा देवीचा चांदीचा मुकुट चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0
IMG-20260221-WA0011.jpg

पुणे : येरवडा परिसरातील यल्लमा देवी मंदिरातून चांदीचा मुकुट चोरी करणाऱ्या आरोपीला लक्ष्मीनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत सुमारे ७०० ग्रॅम वजनाचा, अंदाजे १ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकुट हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी २० फेब्रुवारी २०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १२१/२६, कलम ३०५ (ड) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या वेळी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासास सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या होत्या.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन च्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व इतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला. सुरक्षानगर, येरवडा येथे सापळा रचून पोलिसांनी शिवराम पापा काळे (वय ४७, रा. सुरक्षानगर, येरवडा) याला शिताफीने ताब्यात घेतले.

कसून चौकशीनंतर आरोपीकडून चोरीस गेलेला चांदीचा मुकुट जप्त करण्यात आला. पोलिसांनी स्पष्ट केले की कारवाईदरम्यान कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाहीत व कोणतेही असभ्य कृत्य करण्यात आले नाही.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, परिमंडळ ०४ चे पोलिस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत तसेच येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे  वपोनि रविंद्र कदम, सपोनि रविकांत नंदनवार, पो.शि.१०७४९/गायकवाड, पो.शि.८८२७/वायाल, पो.शि.१०७४३/शेख, पो.शि.८८४२/जाधव, पो.शि. १७०२/शिंदे, पो.शि.१०५५१/शिंदे, पो.शि.९८११/कांबळे, पो.शि.९९५८/ओंबासे, पो.शि.९१९६/परदेशी यांनी सहभाग घेतला असून, गुन्ह्याचा उलगडा करण्यात तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed