पुणे: घरगुती गॅसचे व्यावसायिक गैरवापर थांबेना; गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरणी मोठी कारवाई; मुख्य सूत्रधार फरार

0
n6431930031734071701654527b078d83815a28260daad94ba0338a5e0751059c5b1566a950a0898f6187a5.jpg

व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; ७२ गॅस टाक्या जप्त, एकाला अटक

पुणे : शहरात व्यावसायिक गॅसचा काळाबाजार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी गस्तीदरम्यान छापा टाकून ७२ गॅस टाक्या जप्त केल्या असून, याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी १० लाख २८ हजार रुपये किमतीच्या गॅस टाक्या आणि टेम्पो असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी सोमनाथ लहू भोजने (३१, रा. वडगाव बुद्रुक, मूळ. तुळजापूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. टाक्या पुरवणाऱ्या विकाश धोंडाप्पा आकळे (रा. वडगाव बुद्रुक) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध विक्रीचा पर्दाफाश
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे तपास पथक उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली गस्त घालत असताना, वडगाव भाजी मंडई परिसरातून गोयल गंगाकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली.

१० लाखांहून अधिक माल जप्त
सापळ्यात टेम्पोमध्ये गॅस सिलिंडर घेऊन विक्रीसाठी जाणाऱ्या सोमनाथला पकडण्यात आले. चौकशीत त्याने ही गॅस टाक्या विकास आकळे यांनी पुरवल्याची कबुली दिली. पोलिसांनी एचपी व भारत गॅस कंपनीच्या ७२ गॅस टाक्या आणि टेम्पो जप्त केला.

गुन्हा दाखल
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७, २८८, ३ (५) तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ ३ चे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईगंडे आणि त्यांच्या पथकाने केली.

शहरात व्यावसायिक आणि घरगुती गॅसचा काळाबाजार सुरूच असल्याने अशा घटनांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed