“पुण्यात मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ६० जण ताब्यात, रोकड आणि मोबाईल जप्त”

पुणे: पुण्यात मटका किंग नंदू नाईकचा जुगार अड्डा फेर उघडकीला, पोलिसांचा छापा, 60 जण ताब्यात
पुणे: शहरातील कुख्यात मटका किंग नंदू नाईकचा शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालयात चालणारा जुगार अड्डा पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पोलिसांनी छापा टाकून 60 जणांना ताब्यात घेतले असून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मोबाईल जप्त केले आहेत.
नंदू नाईक हा शहरात जुगार व्यवसाय चालवण्यासाठी कुख्यात असून त्याच्यावर अनेकदा पोलिस कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही याच ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता. मात्र, काही कालावधीनंतर हा जुगार अड्डा पुन्हा सुरू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत 1 लाख 250 रुपये रोख, 47 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अतिमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथके, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथ, युनिट 1 व 5 च्या पथकाने केली आहे.
नंदू नाईकवर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तरीही तो जुगार व्यवसाय चालवत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून नंदू नाईकला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.