प्रभू श्रीराम रथाचा आकर्षक देखावा; पदमशाली सम्राट मंडळ ट्रस्टचा धार्मिक संदेश

0
SAVE_20260920_135339

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र माझा न्युज – भवानी पेठ येथील पदमशाली सम्राट मंडळ ट्रस्ट, कामगार मैदान, पदमशाली पुरम, पुणे-४२ यांच्या वतीने यंदा ‘प्रभू श्री राम रथ’ हा आकर्षक धार्मिक देखावा सादर करण्यात आला आहे.

या देखाव्यात प्रभू श्रीराम यांच्या रथाची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून, पारंपरिक धार्मिक वातावरण आणि कलात्मक सजावटीमुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. देखाव्याच्या माध्यमातून प्रभू श्रीराम यांच्या आदर्श विचारांचा आणि भारतीय संस्कृतीतील धार्मिक परंपरेचा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.

भाविक तसेच नागरिकांनी या देखाव्याला भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

पदमशाली सम्राट मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed