महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘कर्तव्यरत्न’ पुरस्काराने गौरव

पुणे – पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्तव्यरत्न’ पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी (१० ऑक्टोबर) पंडित भीमसेन जोशी नाट्यमंदिरात पार पडला. या कार्यक्रमात मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.



घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने झालेल्या या सोहळ्यात सफाई सेवक, सेक्शन इन्स्पेक्टर (एसआय), डेप्युटी सेक्शन इन्स्पेक्टर (डीएसआय), चीफ सेक्शन इन्स्पेक्टर (सीएसआय) तसेच माजी उपायुक्त यांचा मान्यवरांच्या हस्ते ‘कर्तव्यरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. शहराच्या स्वच्छतेसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेऊन या पुरस्कार सोहळ्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.