Sassoon Hospital: ससून काही सुधरेना! पेशंटला बेवारस सोडल्याप्रकरणी समितीचा अहवाल गुलदस्त्यात, आठ दिवस झाले कारवाई नाही – वाचा सविस्तर
पुणे: ससून हॉस्पिटलमध्ये बेवारस पेशंट संदर्भामध्ये जी घटना घडली, त्या घटनेला आठ दिवस होऊन सुद्धा दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ससून अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक त्रीस्तरीय समिती नेमली होती, परंतु समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे.
पेशंटला बेवारस सोडल्याप्रकरणी रितेश गायकवाड आणि दादा गायकवाड यांनी अधिष्ठाता एकनाथ पवार यांना भेटण्यासाठी प्रयत्न केला, परंतु त्यांनी भेटणं टाळलं. आठ दिवसांपूर्वीचं हे प्रकरण अजूनही निष्पक्षपाती चौकशीअभावी थांबलेलं आहे.
यल्लाप्पा जाधव यांच्यावर कारवाई नाही-
अस्थिरोग विभाग प्रमुख, वैद्यकीय अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांना एकनाथ पवारांनी पाठीशी घातल्याचा आरोप होत आहे. अस्थिरोग विभाग प्रमुख आणि वैद्यकीय अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिष्ठातांना भेटून डॉक्टरला निलंबित करण्याचा आदेश दिला होता, परंतु तो केवळ नावापुरता ठरला आहे.
डॉक्टरही आक्रमक-
ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आदी कुमार यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल अन्य डॉक्टरही आक्रमक झाले आहेत. अस्थिरोग विभाग प्रमुख, समाजसेवा विभाग प्रमुख आणि वैद्यकीय अधीक्षक हे या घटनेस जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. वैद्यकीय अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
अधिष्ठाता एकनाथ पवार यांच्यावर कारवाई न करण्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात निष्पक्षपाती चौकशी होण्याची शक्यता कमी वाटते. दरम्यान रितेश गायकवाड व दादा गायकवाड यांनी पत्र लिहून या प्रकरणात निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Link source: sakal news online