पुण्यातील पूरस्थितीत बचावकार्यासाठी लष्कराचे जवान मैदानात

0

सतत पडत असलेल्या पावसामुळे पुण्याच्या सखल भागात पाणी साचले पुणे जिल्ह्यासह शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले असून प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

नागरिकांनी घाबरून जावू नये असं आवाहन त्यांना करण्यात येत आहे. बचावकार्याला वेग यावा म्हणून आता लष्कराच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन शहरातील बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा.

सतत पडत असलेल्या पावसामुळे पुण्याच्या सखल भागात पाणी साचले असून अशा परिस्थितीत नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यासाठी लष्कराचे बचाव आणि मदतकार्य पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा साधने आहेत. तसेच लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आली आहेत.

गुरुवार, २५ जुलै रोजी स्थानिक प्रशासनाकडून लष्कराच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली होती. या विनंतीला प्रतिसाद देत लष्कराच्या कृती दलाला तातडीने प्रभावित भागाकडे पाठवण्यात आले. एकूण ८५ जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत. तसेच गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलालादेखील सज्ज राहण्यास सांगितले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed