पुणेकरांनो सावधान! खडकवासलातून विसर्ग वाढणार; सायंकाळी पुन्हा पूरस्थिती निर्माण होणार ?

IMG_20240725_175422.jpg

पुणे शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यात खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्ग मुळे मुळा मुठा नदी पात्राच्या जवळच्या गावांमध्ये, वस्त्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते.

पहाटेपासून पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य करत आहेत. दुपारनंतर पाऊस उतरल्यामुळे पुण्यातील पूरस्थिती कमी झाली आहे. मात्र आता पुन्हा पूरस्थितीत वाढू शकते. कारण खडकवासला धरणातून होणारा विसर्ग वाढवला जाणार आहे.

आज दुपारी 4 पासून खडकवासला धरणातून 35 हजार क्यूसेसने पाणी सोडले जात आहे. तर आता 15 हजार क्यूसेसने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून सायंकाळी सहा वाजता 40000 क्यूसेकने पाणी सोडले जाणार आहे, गरजेनुसार यामध्ये कमी अधिक प्रमाणात बदल केला जाऊ शकतो, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सकाळी शिरलेले पाणी असून घराच्या बाहेर निघालेले नसताना आता विसर्ग वाढवल्याने पुन्हा पाणी घरात शिरण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आजूबाजूच्या गावांनी आणि संबंधित रहिवाशांनी आपल्या व इतरांच्या जीविताची काळजी घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

You may have missed