पुणे : येरवडा परिसरात असलेल्या अग्रवाल वाईन शॉपमध्ये अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर पद्धतीने दारू दिल्याच्या आणि मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात शिवसेना युवासेनाने पोलीसस्टेशनला दिला आंदोलनाचा इशारा… आंदोलनला यश अगरवालवाईन शॉप सील | VIDEO

IMG-20240718-WA00161.jpg

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पंचवीस वर्षांखालील मुलांना दारू विकण्यास मनाई केली होती. तरीसुद्धा, काही दिवसांपूर्वी येरवडा परिसरात एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेमुळे दोन जणांचा जीव घेतला होता. या घटनेत वाईन शॉप मालकांची निष्काळजीपणा आणि बेकायदेशीर दारू विक्रीमुळे एक अल्पवयीन व्यक्तीचा मृत्यू झाला. मुलाचे वय नसताना वाईन शॉप मालकाने त्याला दारू दिल्यामुळे हे संकट आले. व्यवसायासाठी कायद्याचे उल्लंघन करून वाईन शॉप चालवणाऱ्या व्यक्तींवर त्वरित कायदेशीर कारवाई करून त्यांचे लायसन्स रद्द करावे, अशी मागणी अशिष मधुकर कांबळे, युवासेना उपशहर प्रमुख यांनी केली आहे.

आगरवाल वाईन शॉपवर त्वरित कायदेशीर कारवाई करून लायसन्स रद्द करण्यात यावे, अशी तक्रार एक्साईज विभागाकडे करावी, अशी मागणी शिवसेना युवा सेनेने केली आहे. जर कारवाई झाली नाही आणि मुलीला न्याय मिळाला नाही, तर येरवडा पोलीस स्टेशन आणि डीसीपी ऑफिससमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असे निवेदन देण्यात आले आहे.

या प्रसंगी अशिष मधुकर कांबळे, युवासेना उपशहर प्रमुख, निलेश गिरमे, शिवसेना पुणे शहर समन्व्यक शंकर संगम, युवा सेना पुणे शहर संघटक जितेंद्र जंगम, युवा सेना पुणे शहर चिटणीस मंगेश सालसकर, युवा सेना प्रभाग प्रमुख केवल्य पासळकर, शिव कामगार सेना पुणे उप शहर प्रमुख रमेश साळुंके, बाळू जिरग्याळ आदी उपस्थित होते.

Spread the love