पुणे: लाच घेताना रंगेहाथ पकडलेली महिला लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

0

पुणे – आरटीई (शिक्षणाचा हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या फीची परतफेड करण्यासाठी शिक्षण विभागाच्या मुख्य लिपिकाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी अँटी करप्शन विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणात प्राथमिक शिक्षण संचालनालय, सेंट्रल बिल्डिंग कार्यालय, पुणे येथे कार्यरत असलेल्या मुख्य लिपिक सुनिता माने (वय ४६) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत तक्रारदाराने आपल्या दोन शाळांसाठी आरटीई अंतर्गत देय असलेल्या १२ लाख ६९ हजार रुपयांच्या फीची रक्कम मिळावी यासाठी माने यांनी एक टक्के म्हणजेच १२ हजार ६०० रुपयांची लाचेची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराने अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दिल्यानंतर, विभागाने पडताळणी करून लाच स्वीकारतानाच माने यांना अटक केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *