पुणे: भारती हॉस्पिटलमधील रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांकडून तोडफोड; शिवीगाळ, धक्काबुक्की; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

6128e6b1c37da200019cddda.jpg

पुणे – भारती हॉस्पिटलमध्ये एका ८६ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सहा नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

या संदर्भात डॉ. अंकिता ग्रोवर (वय ३६) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीच्या आधारे महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियमांतर्गत आणि अन्य कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, मंगळवारी (७ जानेवारी) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात हा प्रकार घडला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रुग्णालयाच्या सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त नातेवाईकांनी सुरक्षारक्षक तृप्ती लोखंडे, श्रीदेवी डोईफोडे, निर्मला लष्कर, तसेच कर्मचारी सुनील दाते, अतुल शिंदे, चैतन्य दधस आणि प्रशांत ओव्हाळ यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली.

तसेच, रुग्णालयातील लाकडी स्टुल उचलून केबिनच्या काचेवर फेकून मारले. या प्रकारानंतर स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोर

Spread the love