पुणे: प्रेमाच्या जाळ्यात ओढून शिक्षिकेने केला अत्याचार; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल;

teacher-molestation-2024-12-50d8edb976e2f7ee3ada35cfb751dd72-3x2.jpg

पुणे: गंज पेठेतील एका नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेतील एका २७ वर्षीय शिक्षिकेने १७ वर्षीय दहावीच्या विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी शाळेच्या आवारात घडली. पीडित विद्यार्थी भवानी पेठ परिसरात राहतो आणि तो शाळेत दहावीच्या प्रिलियम परीक्षेसाठी आला होता. आरोपी शिक्षिका धानोरी येथे राहते.


विद्यार्थ्याची पालकत्वाची जबाबदारी असूनही, शिक्षिकेने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या घटनेनंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिक्षिकेला अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक तोंडे करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील या ठिकाणी भेट देऊन माहिती घेत आहेत.
हे प्रकरण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारे आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांवर विद्यार्थ्यांची विश्वासघात करण्याचा आरोप लावताना पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Spread the love