पुणे: विश्रांतवाडी पोलीस तपास पथकाचे यश: चोरीच्या मालासह चोरटा पकडला

0

विश्रांतवाडी, हडपसर, मुंढवा आणि परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला बातमी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

तपास पथकातील पोहवा संजय बादरे, अमजद शेख, वामन सावंत आणि किशोर मुसारे यांनी तात्काळ हालचाल करून लातूर जिल्ह्यातील मोघा या गावात जाऊन आरोपी शेखर संभाजी जाधव (वय २५ वर्षे) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याचा अल्पवयीन साथीदार सोन्या ऊर्फ सैजान अन्सारी याच्यासोबत हा गुन्हा केला असल्याचे उघड झाले.

पोलीस तपासात चोरीस गेलेल्या मालापैकी मोबाईल, पॉवर बँक, कार चार्जर यासह १.४३ लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपीकडून हडपसर, चंदननगर आणि भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांत चोरीस गेलेली रोख रक्कम आणि मोटारसायकली मिळून आल्या आहेत. या कारवाईत एकूण ३.८५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई मा. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४. पुणे शहर, मा. श्रीमती अनुजा देशमाने, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, मा. श्रीमती कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे, श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री नितीन राठोड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *