पुणे: शिवजयंती उत्सव २०२५: वारजे रामनगरमध्ये उत्साहात शिवजयंती साजरी

IMG_20250219_180956.jpg


पुणे: वारजे रामनगर येथील शिवशंभू राजे प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती २०२५ च्या निमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वर्षी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १२० नागरिकांनी सहभाग घेतला. काही जणांनी मोतीबिंदूसाठी नावनोंदणीही केली.

कार्यक्रमाच्या समारोपाला प्रतिष्ठानतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सर्वत्र खेळीमेळीच्या वातावरणात शिवजयंती साजरी झाली. या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे सागर वाळंज, मंगेश पासलकर, प्रकाश शिंदे, राजू अदमाने, विजय मरे, प्रमोद सुतार, दत्ता रणदिवे, लहू कडू, रियाज शेख, महेश शेलार यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला.

शिवशंभू राजे प्रतिष्ठान शाळकरी मुलांनी १६ वर्षांपूर्वी स्थापन केले होते. प्रतिष्ठानच्या सुरुवातीच्या टप्प्यात गडकिल्ले मोहिमा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची जनजागृती, किल्ले स्पर्धा, चित्रकला व निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र, काही काळानंतर सदस्य विविध कामांमुळे विखुरले.

यंदाच्या उत्सवासाठी मोहिमेत पुन्हा एकत्र येण्यासाठी लहान शिवभक्त मोहित शिंदे, आर्यन शिंदे, आर्यन झोरे, शंतनू गिरी, पियुष खंडाळे, रिहान, आर्यन ढेबे, तन्मय आणि शिवकन्या यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रतिष्ठान पुन्हा सक्रिय झाले व शिवजयंती उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात पार पडला.

यावर्षीचा शिवजयंती उत्सव वारजे रामनगरमध्ये ऐतिहासिक ठरला असून पुढील वर्षी आणखी मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा निर्धार प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.

Spread the love

You may have missed