पुणे: अल्पवयीनवर लैंगिक अत्याचार; कोंढव्यात तरुणावर गुन्हा दाखल

पुणे – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमालउद्दीन वारीस खान (रा. कॅप्रेकॉन अपार्टमेंट हाउसिंग सोसायटी, कोंढवा खुर्द) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केटरींगचे काम करत असताना त्याची पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. याबाबत पीडितेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
तक्रारीनुसार, आरोपीने पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमे तसेच ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास कोंढवा पोलिसांकडून सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
—