पुणे: परवानगीविना रस्ता खोदकाम: टाटा कंपनीवर कारवाईची मागणी – व्हिडिओ

पुणे, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील वाडिया कॉलेज चौकाजवळ टाटा कंपनीने परवानगीशिवाय ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी रस्ता खोदल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या पत व वाहतूक विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता मोठा खड्डा खोदण्यात आला असून, घटनास्थळी बॅरिकेड्स किंवा वाहतूक कर्मचारीही उपस्थित नव्हते.
हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा असून, रस्ते खोदकामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे महापालिकेच्या रस्ते विभागाने घटनास्थळी पाहणी करून संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पहा व्हिडिओ
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत रस्ता खोदकामास बंदीचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, टाटा कंपनीने या आदेशांकडे दुर्लक्ष करून काम सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात राजकीय संघटनांनी महापालिकेकडे तातडीने दंड वसूल करण्याची तसेच संबंधित ठेकेदारास काम बंद करण्याची नोटीस बजावण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.