दुधनी येथील जि.प.प्रा.मराठी केंद्र शाळेत चिमुकल्यांच्या आनंददायी फूड फेस्टिवल संपन्न

IMG-20250111-WA0034.jpg

अक्कलकोट (प्रतिनिधी), दि. १२
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जि.प.प्रा.मराठी केंद्र शाळेत विद्यार्थ्यांसाठी आनंददायी फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात रंगलेल्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून शिक्षणाबरोबरच व्यवहारज्ञानाचा आनंद घेतला.

फेस्टिवलची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गोरखनाथ दोडमनी यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उद्घाटन श्री मल्लिनाथ कोटनूर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे शिक्षणप्रेमी सैदप्पा झळकी आणि अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री पोमू राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा गौरव केला. श्री राठोड म्हणाले की, “फूड फेस्टिवलचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहारज्ञान देणे, विविध खाद्यपदार्थांची ओळख करून देणे आणि व्यवसायिक दृष्टिकोन विकसित करणे हा आहे.”

विद्यार्थ्यांनी समोसे, गुलाबजामुन, उत्तप्पा, पावभाजी, वडापाव, कचोरी, भेळ, पाणीपुरी तसेच फळांचे स्टॉल लावले होते. या फेस्टिवलमधून हजारो रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांनी सहशालेय उपक्रमांचा आनंद घेतला.

केंद्रप्रमुख श्री सुरेश शटगार यांनीही महोत्सवात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री हणमंत कलशेट्टी, शिक्षणतज्ञ सैदप्पा झळकी, श्री मिहिदमिया जिडगे, श्री श्रीशैल मलगण, श्रीम. शोभा म्हेत्रे यांसह अनेक मान्यवर, शिक्षकवर्ग व पालक उपस्थित होते.

Spread the love

You may have missed