पुणे: रामवाडीमध्ये पेट्रोल चोराकडून सहा दुचाक्यांना भीषण आग; आरोपी अटकेत – पहा व्हिडिओ

पुणे, ता. ८ जुलै – शहरातील रामवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री पेट्रोल चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाच्या निष्काळजीपणामुळे सहा दुचाक्यांना भीषण आग लागण्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश बाजीराव पाटील (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. तो गाड्यांमधून पेट्रोल काढत असताना, तेथेच सिगरेट ओढण्याचा प्रयत्न करत होता. पेट्रोलच्या वासट्यात सिगारेट पेटवल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले आणि सहा दुचाक्यांना आगीने ग्रासले.
पहा व्हिडिओ
Link source: civc mirror
घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि आरोपी प्रथमेश पाटील याला ताब्यात घेतले. या प्रकरणी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 326(अ) (जाणीवपूर्वक आग लावणे) आणि कलम 303 (पेट्रोल चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे रामवाडी परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.