पुणे: राज्यात विधानसभा निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष, वडगाव शेरीत सुनील टिंगरे आघाडीवर

IMG_20241123_111140.jpg

पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेचा उत्साह आज शिगेला पोहोचला आहे. आज, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता एकाचवेळी मतमोजणीला सुरुवात झाली असून, निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सध्या सुनील टिंगरे आघाडीवर असून, त्यांनी विरोधी उमेदवार बापू पठारे यांना मागे टाकत सुरुवातीपासूनच लीड मिळवली आहे.

मतमोजणीतील आघाडीचे चित्र:

पहिली फेरी:
सुनील टिंगरे – ६,३२७ मते
बापू पठारे – ५,५५९ मते
आघाडी – ८०१ मते

दुसरी फेरी:
सुनील टिंगरे – १३,२१४ मते
बापू पठारे – १०,८२२ मते
आघाडी – २,३९२ मते

चौथी फेरी:
सुनील टिंगरे – ८,३९२ मते (एकूण आघाडीने वाढ)

सहावी फेरी:
सुनील टिंगरे – ११,५९३ मते (आघाडी स्थिर)

सातवी फेरी:
सुनील टिंगरे – १५,६४७ मते (सर्वाधिक आघाडी)


महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार बापू पठारे हे सातत्याने पिछाडीवर असून, सुनील टिंगरे यांच्या जोरदार आघाडीमुळे त्यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट होत आहे.

सर्वत्र उत्सुकता

मतमोजणी प्रक्रियेत आघाडीचा खेळ रंगताना, मतदार आणि समर्थकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. वडगाव शेरीतील निकालावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले असून, या विजयाने विधानसभा मतदारसंघात नवा इतिहास घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

– विशेष प्रतिनिधी, पुणे

Spread the love

You may have missed