पुणे: वडगावशेरी विधानसभा निवडणूक ईव्हीएममुळे हरली; डॉ. हुलगेश चलवादी यांचा आरोप

पुणे: वडगावशेरी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दलित, ओबीसी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला होता, तसेच माध्यमांमध्ये आणि प्रचारांमुळे त्यांची चांगली चर्चाही झाली होती.
मात्र, निवडणुकीच्या निकालाने त्यांना मोठा धक्का बसला. “माझं नाव जरी चर्चेत असलं, तरी मतमोजणीच्या वेळी माझ्या मतांची आकडेवारी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती,” असं त्यांनी सांगितलं.
डॉ. चलवादी यांनी आरोप केला की, बहुजन समाजातील प्रतिनिधीला विधानसभा पोहोचू नये यासाठी आर्थिक दबाव, प्रचंड फी, आणि इतर उपायांचा वापर करण्यात आला. पण तरीही लोकांनी त्यांचा पाठिंबा सोडला नाही. त्यामुळे निवडणूक हरवण्यासाठी ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात आला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“ही निवडणूक लोकशाहीवर आधारित नव्हती, हे निकाल ईव्हीएम मशिनमुळे लागले आहेत. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,” असा इशारा त्यांनी दिला.
डॉ. हुलगेश चलवादी यांच्या मते, वडगावशेरीचा निकाल हा लोकांचा विजय नसून, तो ईव्हीएमचा विजय आहे. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.