पुणे: येरवड्यात विभत्स नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; १४ वर्षीय मुलावर कारवाई – व्हिडिओ

IMG_20250217_110414.jpg

येरवडा : श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त १५ फेब्रुवारी २०२५ रोजी लक्ष्मीनगर, लामान तांडा आणि सेवालाल चौक परिसरात काढलेल्या मिरवणुकीत एका १४ वर्षीय मुलाने अश्लील चाळे करत नृत्य केल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला.

येरवडा पोलीसांनी सदर मुलाचा शोध घेऊन लामान तांडा, नाईक नगर परिसरात शोध घेतला असता मुलगा मिळून आला. तो विधीसंधर्ष ग्रस्त बालक असून, मूळ गाव यादगिरी, जिल्हा गुलबर्गा (कर्नाटक) आहे. मुलगा कोणत्याही मंडळाचा सदस्य नसून कार्यक्रम पाहण्यासाठी तो सेवालाल चौकात गेला होता.

पहा व्हिडिओ

घटनेदरम्यान मुलगा कात्रज डेअरीच्या स्टॉलवर चढून अश्लील नृत्य करत असल्याचे स्पष्ट झाले. मुलाची आई चांदबाई निळू पवार (वय ३५) यांना घटनेची माहिती देऊन नोटीस बजावण्यात आली. तसेच सदर मुलाला १७ फेब्रुवारी रोजी बाल न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

घटनेबाबत ठाण्यात नोंद झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Spread the love

You may have missed