येरवड्याच्या युवकाची राष्ट्रीय पातळीवर कामगिरी: किकबॉक्सिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल
पुणे: येरवड्याच्या जय जवान नगर येथील रहिवासी, ज़ैद शेखने पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित अंडर-19 वेट कॅटेगिरीतील किकबॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. ज़ैदने आपल्या कामगिरीने संपूर्ण पुणे शहरासह येरवड्याचे नाव उंचावले आहे.
या यशामागे ज़ैदच्या प्रशिक्षक सलमान चौधरी आणि अंगलो उर्दू कॉलेजचे पी.टी. शिक्षक अमजद पठाण यांचे मोलाचे योगदान आहे. येरवड्यातील असंख्य युवकांमध्ये ज़ैदसारखी क्षमता असली तरी, योग्य मार्गदर्शन व खेळाची मैदाने उपलब्ध नसल्याने अनेकांची भविष्ये धूसर होत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांनी व संस्थांनी येरवड्याच्या अशा गुणी क्रीडापटूंना पुढे आणून त्यांना आवश्यक प्रशिक्षण व प्रोत्साहन द्यावे, अशी गरज व्यक्त केली जात आहे. या मोहीमेतून आपल्या येरवड्याच्या युवकांचे भविष्य घडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.